Pune कॅन्टोन्मेंटच्या 'पे अँड पार्क'मध्ये मनमानी वसुली? ८ रुपयांऐवजी दुचाकीसाठी २० रुपये आकारल्याचा आरोप!
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील 'पे अँड पार्क'मध्ये वाहनचालकांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकृत दरानुसार दुचाकीसाठी ८ रुपये आणि चारचाकीसाठी ३० रुपये शुल्क असताना, दुचाकीसाठी २० रुपये घेतल्याचा दावा नागरिकाने केला आहे.
इतकेच नव्हे, तर रात्री ९ वाजल्यानंतरही पार्किंग शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकाराची पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने दखल घेऊन चौकशी करावी आणि नियमबाह्य वसुली थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
#Pune #PuneCantonment #PayAndPark #ParkingCharges #PuneNews PublicIssue पुणे पार्किंग