मुरुड: मुरुडमधील कोळी समाजाला आधुनिक सुविधा मिळणार
Murud, Raigad | Apr 26, 2026 मुरुड-जंजिरा परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि कोळी समाजासाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटनाला चालना देणारा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. मासेमारीपासून पर्यटनापर्यंत विविध क्षेत्रांचा समतोल विकास साधण्यावर भर देत स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.