कोंढव्यात ९ मजली कथित अनधिकृत बांधकाम सुरूच; महापालिकेच्या नोटिशीनंतरही कारवाई नाही?
पुण्यातील कोंढवा खुर्द परिसरात नूरानी कब्रस्तानसमोर सर्व्हे क्रमांक ४६ मध्ये नऊ मजली इमारतीचे कथित विनापरवाना बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५३(१)(अ) अंतर्गत नोटीस बजावली असतानाही बांधकाम सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
बांधकाम थांबवण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित बांधकामाची तातडीने पाहणी करून काम थांबवावे, परवानग्यांची तपासणी करावी आणि नियमभंग आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
टीप: बांधकाम अनधिकृत असल्याचा �
Pune City, Pune | Nov 27, 2026