महाड: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
Mahad, Raigad | May 18, 2026 मुंबई-गोवा महामार्गावर चांढवे गावाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच काल दि. 17 मे रोजी सायंकाळी सुमारे 5.50 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने पुढे जाणाऱ्या दुचाकीला तसेच टोयोटा अल्टो कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले असून दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.