बदनापूर: खुलताबाद भद्रा मारुती येथे आमदार नारायण कुचे यांनी घेतले भद्रा मारुतीचे विधीवत पूजन करत दर्शन
Badnapur, Jalna | Jun 27, 2026 आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी सकाळी 8वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील रेणापूर येथे भद्रा मारुती मंदिरामध्ये जात भद्रा मारुतीच्या मूर्तीची विधिवत पूजन करत दर्शन घेतले आहे, मतदारसंघातील व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे नागरिकांचे आरोग्य सुखी समाधानी सुदृढ राहो अशी प्रार्थना त्यांनी भद्रा मारुतीच्या चरणी केली आहे, याप्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.