काटोल: काटोलमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
Katol, Nagpur | Jun 30, 2026 नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे काटोलमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.रामेश्वर उर्फ दादा रामराव धुर्वे (वय २६, रा. बैतुल) आणि रोशन उर्फ रसू दीपक नागवत (वय २५, रा. बैतुल) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.आरोपींनी २७ एप्रिल २०२६ रोजी काटोल येथील रामटेक बाबा ले-आउटमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.