उमरेड: बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरण: पोलिसांकडून आणखी तिघांना अटक
Umred, Nagpur | Apr 10, 2026 बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी पाचगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणखी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 'गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'शी संबंधित या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.९ एप्रिल रोजी पोलिसांनी मुकेश चौबे आणि जगन्नाथ शेरकुरे या दोघांना अटक केली होती.तपासादरम्यान काल रात्री अमोल देविदास घोडे,शुभम बालाजी खोरगडे आणि रितेश मधुसूदन सहारे या तिघांना ताब्यात घेतले.