रामटेक: अप्पर तहसील कार्यालय देवलापार समोर जन आंदोलन सुरु
Ramtek, Nagpur | Mar 12, 2026 रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल देवलापार, पवनी परिसरात मागील कित्येक महिन्यांपासून वाघाच्या हल्ल्यात पशुंसह मानवाचे ही बळी गेले आहेत . या अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासन, प्रशासन व वनविभागाद्वारे कायमचा स्थायी तोडगा काढण्याचे नियोजन करावे या मागणीसाठी गुरुवार दिनांक 12 मार्चला दुपारी दोन वाजता पासून अप्पर तहसील कार्यालय देवलापार समोर देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीद्वारे धरण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.