सावनेर: भानेगाव येथून इसम झाला बेपत्ता, खापरखेडा पोलीस स्टेशन येथे नोंद
Savner, Nagpur | Jul 3, 2026 भानेगाव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन उपासे लेआउट येथे राहणारे युवराज अंकुश वाघमारे हे दिनांक एक जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजाच्या दरम्यान मी बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेले त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाही कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे