उमरेड: पोलिसांची मोठी कारवाई: हातभट्टीवर धाड, मुद्देमाल जप्त
Umred, Nagpur | Jun 6, 2026 पाचगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा चांपा येथे अवैध हातभट्टीवर कारवाई केली आहे.पोलिसांनी २०० लिटर मोहफुलाचा सडवा, १०० लिटर रसायने, ४० लिटर मोहफुलाची गावठी दारू आणि इतर साहित्य असा एकूण ५४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल नष्ट करण्यात आला.