कामठी: भिलगाव हादरले: झाडावर वीज कोसळून १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Kamptee, Nagpur | May 13, 2026 भिलगाव येथील परिसरात आज सायंकाळच्या सुमारास निसर्गाचा थरार पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाचा आश्रय घेणे दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले. झाडावर वीज कोसळल्याने उज्वल भेलावे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा मित्र देवांक पारधी हा गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उज्वल भेलावे आणि देवांक पारधी हे दोघेही **महात्मा गांधी शाळेचे** विद्यार्थी होते.