सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 5, 2026 दिनांक 4 जुलै रोजी खापा पोलिसांना माहिती मिळाली की जवाहर टी पॉइंट खापा येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान तीन वाहन मिळून आले पोलिसांनी वाहन थांबून तपासणी केली असता वाहन चालक सुमित मुरलीधर भोयर, लकी भाऊराव रुंदे,अमोल वसंतराव कुडे,जगदीश मनोहर बोरिवार पंचासमक्ष तपासनि केली असता त्यामध्ये 9 गोवंशीय जनावरे मिळून आले.