Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

पनवेल: पनवेल महानगरपालिका परवाना विभागामार्फत व्यवसाय पर

Panvel, Raigad | Nov 21, 2025
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार हिरानंदानी, खारघर परिसरात पनवेल महानगरपालिका परवाना विभागामार्फत व्यवसाय परवाना शिबीराचे आयोजन करण्यात आले. पालिका क्षेत्रातील छोटे-मोठे व्यावसायिकांना परवाना मिळविण्यासाठी वारंवार पालिका कार्यालयात येण्याची व रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी एकाच ठिकाणी अर्ज सादर करून, कमीत कमी आवश्यक कागदपत्रे प्रदान करीत त्याच दिवशी व्यवसाय परवाना मिळावा यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त रविकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष शिबीराचे आयोजित करण्यात आले. या शिबीरास व्यावसायिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केलेल्या व्यवसायिकांना तात्काळ व्यवसाय परवाना देण्यात आला.