सुधागड एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्यालय, कळंबोली (पनवेल) येथे ‘हिंद दि चादर’ कार्यक्रमांतर्गत गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत गुरुजींच्या त्याग व शौर्याचे चित्रांद्वारे प्रभावी दर्शन घडवले.