काटोल: काटोल पोलिसांची मोठी कारवाई: अवैध दारू अड्ड्यावर धाड
Katol, Nagpur | Jun 7, 2026 नागपूर ग्रामीणच्या काटोल पोलीस स्टेशनच्या पथकाने मौजा पारधीबेडा डोंगरगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध मोहफुल दारूच्या भट्ट्यांवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. यात ३४०० लिटर मोहफुल सडवा आणि ५२ लिटर दारूचा समावेश आहे.