जागतिक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक दिन - 30 जुलै 2026रोजीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर तर्फे पोलिस आयुक्त मा.श्री एम.राजकुमार सर, पोलिस उप आयुक्त डॉ. अश्विनी पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनुसार पोलिस निरीक्षक स्नेहा म्हेतर व AHTU च्या वतीने 24 जुलै ते 30 जुलै दरम्यान "सात दिवसीय जनजागृती सप्ताह" राबविण्यात येत आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत Anti Human Trafficking Unit (AHTU) शाखेच्या अंमलदारांनी मानव तस्करी प्रतिबंधाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी सुशील मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच दलित मित्र भीमराव जाधव प्रशाला , श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर विजापूर रोड येथे एकूण 350 ते 400 विद्यार्थ्यांना मानव तस्करी म्हणजे काय, तिचे प्रकार, फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सतर्कता, सुरक्षिततेची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते.
16 views | Solapur, Maharashtra | Jul 24, 2026