शहादा: आ. आमश्या पाडवी पदाचा राजीनामा द्यावा, नंदुरबार येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात उद्धव ठाकरे गटाकडून निषेध
विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील पदाधिकारी हे चांगलेच नाराज झाले असून त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यामुळे त्यांनी आमदार आमश्या पाडवीचा जाहीर निषेध करून राजीनामा देण्याची मागणी केली आहे. नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, युवा जिल्हाध्यक्ष यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली.