शहादा: तऱ्हावद पुलाजवळ आढळला बेपत्ता एसटी वाहकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह, शहादा पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
शहादा येथील सदाशिव नगरात राहणारे राजेंद्र उत्तमराव मराठे हे राज्यपरिवहन महामंडळाच्या शहादा आगारात एसटी बसचे वाहक आहेत. दि.१३ मार्च रोजी राजेंद्र मराठे हे दुपारी चार वाजेच्या सुमारास किराणा घेवून येतो असे घरी सांगून गेले. परंतु ते घरी आलेच नाही याबाबत १६ मार्च रोजी रात्री ८ आठ वाजता पोलिसांना ११२ वर माहिती देण्यात आली की तऱ्हावद ते नांदर्डे गाव दरम्यान पुरुषाचा मृत्यू आढळून आला त्यानंतर १७ मार्च रोजी पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर व्यक्ती ही राजेंद्र मराठे असल्याचे निष्पन्न झाले.