शहादा: धुळे चौफुली जवळील अवल गाजी दर्ग्यासमोर भरधाव हायवा कंपनीच्या डंपरने 16 वर्षीय विद्यार्थिनींना चिरडले
नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवरील अवल गाजी दर्ग्या समोर भरला वेगात येणाऱ्या हायवा कंपनीच्या डंपर जीजे 16 एव्ही 6688 ने डिंपल सतीश पाटील या 16 वर्षीय विद्यार्थिनीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये चालक विनयकुमार रामचंद्र प्रसाद रा.अमरा पोस्ट औरंगाबाद सरैय्या जि. रोहलास याच्याविरुद्ध सतीश आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.