शहादा: कलसाडी रस्त्यावरील कन्हेरी नाल्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील कलसाडी रस्त्यावरील कन्हेरी नाल्याजवळील चेरीच्या फॅक्टरीजवळ ट्रक मागे घेताना दुचाकीला धडक लागल्याची घटना १४ मार्चला रात्री घडली. या अपघातात दिपक जगन शेमले हे जखमी झाले असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालकावर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.