शहादा: उदयपूरला झालेल्या अपघातग्रस्त रुग्णांची जिल्हा रुग्णालयात आमदार राजेश पाडवी, आ. काशीराम पावरा यांनी केली पाहणी
उदयपूर ता.अक्कलकुवा येथे देवमोगरा माता चे दर्शन करून येत असलेल्या भाविकांचा दुर्दैवी अपघात झाला असून अपघात ग्रस्तरुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयाला जाऊन सगळ्यांची चौकशी आणि विचारपूसही केली.यावेळी शिरपूर विधानसभेचे आ.काशिराम पावरा .व जिल्हा रुग्णातील डॉक्टर उपस्थित होते.