पालघर: राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण परिसरात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ६ जण जखमी
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात घडला आहे. गुजरातच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कारला धडकला या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला आहे. कारमधील सहाजण या अपघातात जखमी झाले असून या चार लहान मुलांचा समावेश आहे. अपघातातील जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सेलवासा येथील रुग्णालयात घालवण्यात आले आहे.