पालघर: 287 वा वसई विजय वसई येथे उत्साहात साजरा
नरवीर चिमाजी अप्पांनी शौर्य गाजवून वसई किल्ला जिंकला वसईला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केले या विजयाचे स्मरण म्हणून वसई विजय उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. वज्रेश्वरी देवी मंदिर येथून मशाल यात्रेला प्रारंभ झाला त पारनाका येथे मिरवणुकीद्वारे ही मशाल यात्रा वसई किल्ला स्मारक येथे पोहोचली. स्मारक पूजन व चिमाजी अप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तरुण-तरुणी, नागरिक, आमदार, जिल्हाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने वसई विजयोत्सवात सहभागी झाले.