पालघर: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार परिसरात दुचाकीचा अपघात; दोन तरुणांचा मृत्यू
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार परिसरात दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. हालोली-बोट परिसरातून लग्न समारंभातून घरी परतत असताना दुचाकी काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अशोक खांडवा आणि पारस वर्धा वरठा अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.