पालघर: चंदनसार- कातकरीपाडा परिसरात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक;10 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त
चंदनसार- कातकरीपाडा परिसरात एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष तीन विरार पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून एका संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे बॅगमध्ये व पिशवीमध्ये गांजा हा अमली पदार्थ आढळला. पोलिसांनी 10 किलो 100 ग्रॅम वजनाचा 3 लाख 3 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी आकाश जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.