पालघर: कादिवली येथे जमीन विक्रीत फसवणूक; चार आरोपीं विरोधात गुन्हा दाखल
वाडा पोलीस ठाणे हद्दीत जमीन विक्रीत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी स्मिता सुभाष कोडलेकर व साक्षीदार यांचे खोटे कुलमखत्यार पत्र बनवून खोट्या सह्या करून त्यावर इतर महिलांचे फोटो लावून आरोपी रिजवानबाबू खोतकर व इतर तीन अनोळखी महिलांनी कोडलेकर यांच्या संमतीशिवाय त्यांची जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. याप्रकरणी रिजवान खोतकर व तीन अनोळखी महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.