उमरेड: उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात माय-लेकींत वर्चस्वासाठी संघर्ष, बघा थरारक वायरल व्हिडिओ
Umred, Nagpur | Jun 16, 2026 उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात 'एक्स मार्क' वाघीण आणि तिची मुलगी 'एच मार्क' यांच्यात स्वतःच्या क्षेत्रासाठी तुंबळ युद्ध सुरू आहे. 'एक्स मार्क'ने नुकत्याच जन्म दिलेल्या छाव्यांच्या सुरक्षिततेसाठी ती आक्रमक झाली असून, आपली दोन वर्षांची मुलगी 'एच मार्क'ला ती जंगलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे..