उरण: रानसईसह पुनाडे धरणात अवघा 47 टक्के पाणीसाठा
Uran, Raigad | Apr 8, 2026 एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उरण तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीपातळी वेगाने खालावत आहे. येथील रानसई आणि पुनाडे या दोन मुख्य धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 47.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही स्थिती काहीशी समाधानकारक असली, तरी मान्सून आगमनापर्यंत म्हणजेच पुढील दोन ते अडीच महिने हे पाणी पुरवून वापरण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.