जाफराबाद: छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला शिवसेना उद्धव बा.ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला पाठिंबा
आज दि.17 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिल्ली जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण नीट परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली देशातील कोटेवादी विद्यार्थ्यांचे नुकसान झालं याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.