नागपूर शहर: नागपुरात गुन्हे शाखा युनिट क्र. ४ ची मोठी कारवाई; एम.डी. पावडर बाळगणारा आरोपी अटकेत
21 ऑगस्टला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट ४ च्या अधिकाऱ्यांना व अंमलदारांना गोपनिय माहिती मिळाली की, केडीके कॉलेज टी पॉईंट जवळील मैदानात एक इसम संशयास्पदरित्या उभा असून तो एम.डी. पावडरची विक्री करत आहे. या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन टीव्हीएस ज्युपिटर मोपेडजवळ उभ्या असलेल्या नूर मोहम्मद ला ताब्यात घेतले.त्याच्या मोपेडमधील एका झिपलॉक पन्नीमध्ये १०.८६० ग्रॅम वजनाची एम.डी. पावडर आणि विक्रीचे रोकध ३,५