रामटेक: गंगा भवनम रामटेक येथे रामटेक भगिनी मंडळ व भाजपा महिला आघाडी तर्फे विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन
Ramtek, Nagpur | Mar 11, 2026 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रामटेक भगिनी मंडळ रामटेक व भाजपा महिला आघाडी रामटेक तर्फे गंगा भवन रामटेक येथे बुधवार दिनांक अकरा मार्चला महिलांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांसाठी डान्स, गोड व्यंजन स्पर्धा,हौजी स्पर्धा, कॉमेडी डान्स स्पर्धा, फनी गेम्स, झूट बोले कौवा काटे, बिस्किट खाऊ.. खुश होऊ, कॉमेडी संगीत खुर्ची, चिपकली मावशी स्पर्धा तसेच लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. यात भगिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.