कामठी: कामठीत पावसाचा हाहाकार; एकाचा मृत्यू तर मोठे नुकसान
२५ मे पासून सुरू झालेल्या नवतपामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना 30 मे ला सायंकाळी दिलासा मिळाला, मात्र या पावसाने मोठे नुकसानही केले. सायंकाळी ५ च्या सुमारास आलेल्या रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागाला चांगलेच झोडपून काढले.या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत.