खाकीच्या कर्तव्याला दिवाळीच्या आनंदाची साथ! 🪔✨
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, आपुलकी आणि माणुसकीचा उत्सव…
मा. विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत त्यांना खाकी वर्दीसाठी आवश्यक कपडे, मिठाई आणि भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.
कर्तव्य बजावणाऱ्या खाकीतील प्रत्येक हाताला सन्मानाची आणि आपुलकीची भेट देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद देणारा ठरला.
सण आनंदाचा, नातं आपुलकीचं आणि अभिमान खाकीचा! 🪔❤️