फलटण: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी चे नेतृत्व आता ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे; सरकारचा निर्णय
फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असताना, या प्रकरणातील तपास जलद आणि पारदर्शक होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी नेमलेली आहे. या तपासाची सूत्रे वरिष्ठ आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे शनिवारी सायंकाळी सहा वाजता सोपविण्यात आली आहेत. सातपुते या भारतीय पोलीस सेवेतील अनुभवी अधिकारी असून त्यांनी सातारा व सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून उत्कृष्टरित्या जबाबदारी सांभाळली आहे.