रामटेक: 8 महिन्यापूर्वी कुकचा खून करून नवरगाव शेत शिवारात मृतदेह पुरणारे 5 आरोपी रामटेक पोलिसांच्या ताब्यात
Ramtek, Nagpur | Mar 10, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या टुरिस्ट ढाबा नागार्जुन येथील कुक ला तो नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करतो या कारणावरून रागाच्या भरात ढाबा संचालक कैलास ठाकरे वय 23 वर्षे रा. नवगाव याने दोरीचा फास कुक च्या गळ्यात टाकून त्याला फासावर लटकून जिवानिशी ठार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यानंतर त्याला ढाब्या मागील शेतात नेऊन पुरल्याचेही निष्पन्न निघाल्याने या प्रकरणातील पाच आरोपींना रामटेक पोलिसांनी अटक केली आहे.