Public App Logo
जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive - Jalgaon News