पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी सेलने एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले. ही महिला भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करताना आढळून आली आहे. तिला मायदेशी पाठवण्याची कार्यवाही भोसरी पोलिसांकडून सुरु आहे. फातिमा अमजद अख्तर (३५) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. ती भारतात माला विठ्ठल डावखर उर्फ फातिमा बेगम फईमुद्दीन या नावाने वास्तव्य करत होती.