रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील सोने सांगवी येथे मंगळवारी सकाळी सिमेंटच्या बॅगांची वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळला आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोने सांगवी येथील चढ-उताराच्या रस्त्यावरून जात असताना ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले त्यानंतर वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळल्याने ट्रकचे किरकोळ नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान सोसायटी संचालक दादाभाऊ शेळके यांच्या घरासमोरील परिसरापासून आमदाबाद-मलठण मार्गापर्यंतचा सुमारे ५०० मीटरचा रस्ता अपघाताचा सापळा बनला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
या भागात वारंवार अपघात घडत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
.
.
.
#RanjangaonGanpati
#ShirurNews
#SoneSangvi
#AshtavinayakHighway
#TruckAccident
#RoadAccident
#CementTruckCrash
#MiraculousEscape
Haveli, Pune | Jun 24, 2026