अश्लील मेसेजचा संताप..! मेसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थिनीने भर कॉलेजमध्ये लगावली थप्पड...
.
.
रायगड (छत्तीसगड): गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी आणि तितकीच चीड आणणारी घटना छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील लैलूंगा परिसरातून समोर आली आहे. एका कॉलेजमधील विद्यार्थिनीला सतत अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या नराधम प्राध्यापकाला (प्रोफेसर) विद्यार्थिनीने भर कॉलेजमध्येच जोरदार थप्पड रशीद केली आहे. इतकेच नाही तर तिने आपल्या मंगेतराला (होणाऱ्या पतीला) सोबत घेऊन या विकृत प्राध्यापकाची चांगलीच धुलाई केली.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापक या विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अश्लील आणि घाणेरडे मेसेज पाठवून त्रास देत होता. विद्यार्थिनीने अनेकदा त्याला असे न करण्यासाठी बजावले आणि समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदाची आणि वयाची मर्यादा विसरलेला हा प्राध्यापक आपल्या कृत्यापासून मागे हटण्यास तयार नव्हता.प्राध्यापकाचा मानसिक त्रास असह्य झाल्याने शेवटी या विद्यार्थिनीने स्वतः धडा शिकवण्याचे ठरवले. ती आपल्या मंगेतराला सोबत घेऊन थेट कॉलेजमध्ये पोहोचली. तिथे तिने आधी प्राध्यापकाला जाहीरपणे जाब विचारला आणि त्यानंतर भर कॉलेजमध्येच त्याच्या कानशिलात लगावली. यानंतर संतप्त झालेल्या मंगेतरानेही प्राध्यापकाला चांगलाच चोप दिला. या हायव्होल्टेज ड्रामामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये एकच खळबळ उडाली होती.
या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती समोर आल्यानंतर "अशा विकृत नराधमांना अशीच अद्दल घडायला हवी," अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून आणि विशेषतः महिलांमधून उमटत आहेत.
.
.
.
#RaigarhNews #Lailunga #CollegeScandal #ProfessorBeaten #CrimeNews #WomenSafety #RaigarhCrime #TrendingNews #BreakingNews #JusticeForStudents #socialmediaviral
Haveli, Pune | Jul 2, 2026