उमरेड: उमरेड पोलिसांची धडक कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त
Umred, Nagpur | Apr 29, 2026 उमरेड पोलिसांनी एका कारवाईत अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवापूर बाय-पास येथे सापळा रचून हा ट्रक पकडला. या कारवाईत ३० लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी शुभम केवराम हटवार (वय २६, राहणार मागली, तालुका पवनी) याच्यावर उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.