कामठी: कामठी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमिटीच्या वतीने एस आय आर संदर्भात बैठक संपन्न
Kamptee, Nagpur | Apr 22, 2026 कामठी विधानसभा क्षेत्रातील नागपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एस आय आर संदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीत पुढील काळात संघटितपणे काम करून प्रत्येक भागात जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांना एस आय आर प्रक्रिये बाबत माहिती देण्याची आणि त्यांचा अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे ठरविले