नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्ती — महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन 🇮🇳
नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या अचानक भीषण पुरामुळे अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर झाली असून पर्यटक व प्रवासी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या State Emergency Operations Center (SEOC) मार्फत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
📌 आपल्या कुटुंबातील / परिचित व्यक्ती नेपाळमध्ये अडकल्या असतील तर त्यांची माहिती तात्काळ नोंदवा.
🔗 माहिती नोंदणी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
📞 आपत्कालीन हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री)
☎️ SEOC कंट्रोल रूम: +91-9321587143
📧 ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in
पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर
☎️0721-2551000
🙏 घाबरू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधा आणि ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवा.
अमरावती शहर पोलीस