रत्नागिरी येथील एका दाम्पत्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर IPO व OTC ट्रेडिंगद्वारे अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. या सायबर फसवणूक प्रकरणात ₹11,37,014/- रकमेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित मनी ट्रेलच्या आधारे दोन आरोपींना रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #cybercrime #stayalert #ratnagiri #ratnagiripolice