मिशन फिनिक्स अंतर्गत चिपळूण पोलीस ठाणे हद्दीतील खेर्डी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित इसम आढळून आला. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. सदर कारवाईत मेफेड्रोन व वाहन असा एकूण ₹7,12,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #saynotodrugs #ratnagiri #ratnagiripolice