सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच ; जळगावात आजही भाव उतरले
सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र सुरूच असून, आज शनिवारी पुन्हा एकदा जळगावच्या सराफ बाजारात आज (२१ नोव्हेंबर) सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,५०० रुपयांपर्यंत घसरण झाली. यामुळे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १३ हजार १२० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २३ हजार ५०० रुपये इतका झाला आहे. आज चांदीचा भाव एक हजारांनी घसरून प्रति किलो १ लाख ५४ हजार रुपये झाला.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonnews #goldsilver