महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या वैशिष्टयपूर्ण सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर नेणे तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला युनेस्कोचा वारसा दर्जा व अन्य जागतिक मानांकने प्राप्त करुन देण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
त्याअंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व संचालनालयामार्फत Bappa.org हा उपक्रम राबविण्यात येत आहे....
गणेशोत्सवाशी संबधित
घरगुती व सार्वजनिक परंपरा, गणेशमूर्ती स्थापना,सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, व खाद्यपरंपरा, आठवणी सार्वजनिक इत्यादींची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना WhatsApp च्या माध्यमातून Bappa.org या शासनाच्या अधिकृत मंचावर अपलोड करता येणार आहेत.
तरी सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की राज्य शासनाच्या या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.