चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वालोपे, चिपळूण येथील नदीकिनारी सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान हातभट्टीचे साहित्य, तयार गावठी दारू व दारूनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन असा एकूण ₹1,48,950/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #ratnagiri #ratnagiripolice