उदगीर शहरातील समतानगरमध्ये धोकादायक विद्युत पोल ; नागरिकांच्या जीवाला धोका
उदगीर : उदगीर शहरातील समतानगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विजेचे पोल वाकलेल्या अवस्थेत आहेत. हे पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून त्यावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे शेजारील घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या वाकलेल्या पोलमुळे पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरीही महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
येथील धोकादायक विद्युत पोल तात्काळ काढून त्या ठिकाणी नवीन पोल बसवावेत, अशी मागणी समतानगर येथील नागरिकांमधून जोर धरत आहे.
Latur, Latur | Aug 25, 2026