हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात अवैध व्यवसायांची माहिती लपवणाऱ्या तीन पोलीस पाटलांवर तडकाफडकी निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. चिंचोर्डी, धानोरे आणि वाकोडी येथील पोलीस पाटलांनी अवैध धंद्यांची खबर न दिल्याने उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी सोमवारी ता. ३१ रोजी हे निलंबनाचे आदेश काढले असून, यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
.
#hingolinews #hingoli #kalamnuri #police #Patil #PolicePatil #iblisnews