🌧️ संभाव्य ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे मध्यरात्री प्रशासनाची पाहणी
संभाव्य ढगफुटी व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काल त्र्यंबकेश्वर परिसरात
डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला
यावेळी संबंधित विभागांशी समन्वय साधत आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
🚨 नाशिक ग्रामीण पोलिसांचे नागरिकांना आवाहन :
• प्रशासन व पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा.
• अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका व ती पुढे पाठवू नका.
• नदी, नाले, धबधबे व पूरप्रवण भागा�